Tamil Nadu CM Breakfast Scheme: तमिळनाडू सरकारने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थांना दुपारचे जेवण मोफत देण्याचे ठरवले आहे. या साठी तमिळनाडू सरकारने मुख्यमंत्री नाश्ता योजना सुरु केली आहे. तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शुक्रवारी नागापट्टिनम जिल्ह्यात मुख्यमंत्री नाश्ता योजनेचे उद्घाटन करून मुलांना जेवण दिले. या योजने अंतर्गत सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांना मोफत जेवण देण्याची योजना सुरु केली आहे. ही योजना नक्कीच मुलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सकाळचा नाश्ता सोडून शाळेत येत असल्याने ही योजना सुरु केली आहे. राज्यभरातील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या 1.14 लाखांहून अधिक मुलांना लाभ देण्यासाठी 1454 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ही योजना आज पासून सुरु झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)