Hate Speeches Case: भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) नेत्या वृंदा करात यांनी २०२० मध्ये द्वेषपूर्ण भाषणे केल्याप्रकरणी भाजप नेते अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावली. न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नागरथना यांचा समावेश असलेले खंडपीठ दिल्ली उच्च न्यायालयाच्या भाजप नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची याचिका फेटाळण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध करात यांनी याचिका दाखल केली होती. नोटीस जारी करताना, सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, प्रथमदर्शनी, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी परवानगी आवश्यक आहे, अशी दंडाधिकाऱ्याची भूमिका चुकीची असल्याचे दिसते. (हेही वाचा - 12th Board Exam: 12वी बोर्ड परीक्षेचे गुण 98 टक्यांवरून 99% करण्यासाठी 18 वर्षीय तरुणाने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)