Tamil Nadu Gas Cylinder Explosion: तामिळनाडू येथील तिरूनेवेली शहरातील वडाक्कू राधा वेली येथील समोसाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या आगीत किमान सहा जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेत समोसाचे दुकान संपुर्ण जळून खाक झाले आहे. एवढेच नाही तर जवळपासचे दोन दुकानेच नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. (हेही वाचा- नालासोपारा मध्ये Dwarka Hotel ला आग; चार जण जखमी)
#WATCH | Tirunelveli, Tamil Nadu: 6 people were injured and 2 nearby shops gutted in the fire as a gas cylinder exploded at a shop in Tirunelveli yesterday
(Viral video confirmed by Police) pic.twitter.com/kk1xpws165
— ANI (@ANI) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)