Ratan Tata Funeral: उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी सकाळी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील लोक जमले आहेत. ज्येष्ठ उद्योगपती यांचे बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर गुरुवारी कुलाब्यातील उद्योगपतींच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचला. सचिन तेंडुलकरने रतन टाटा यांना आपल्या एक्स हँडलवरून देखील श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "श्री रतन टाटा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे भाग्य मला लाभले. परंतु, पण लाखो, जे त्यांना कधीच भेटले नाहीत, तेच दु:ख आज मला जाणवते. असाच त्यांचा प्रभाव आहे. परोपकारासाठी प्राण्यांबद्दलचे प्रेम, त्यांनी दाखवून दिले की, ज्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्याचे साधन नाही त्यांची काळजी घेता येते, मिस्टर टाटा, तुमचा वारसा तुम्ही उभारलेल्या संस्था आणि तुम्ही स्वीकारलेल्या मूल्यांद्वारे चालू राहील.

सचिन तेंडुलकरने श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलाबा येथील रतन टाटा यांच्या निवासस्थानी भेट दिली, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)