Sanjay Nirupam On Arvind Kejriwal: तुरुंगातून सरकार चालवणे कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असं काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना संजय निरुपम म्हणाले की, 'अरविंद केजरीवाल यांनी पैसे घेतले आहेत की नाही हे न्यायालय ठरवेल, मी त्यावर काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषतः मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि ते म्हणतात की, ते तुरुंगातून सरकार चालवतील आणि राजीनामा देणार नाहीत, ही एक अतिशय चुकीची प्रवृत्ती दर्शवते. एक व्यक्ती ज्याने 2011-14 पासून प्रामाणिकपणा शिकवला आणि आपण 'कट्टर इमानदार' असल्याचा दावा केला. ते आता नैतिकतेचे कोणतेही मूलतत्त्व दाखवत नाहीत. जर ते प्रामाणिक असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. तुरुंगातून सरकार चालवणे कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. नैतिकता आणि कायदेशीरतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा, असं मत संजय निरुपण यांनी मांडलं आहे. (हेही वाचा -Sukesh Chandrashekhar Message To Arvind Kejriwal: सुकेश चंद्रशेखरचे अरविंद केजरीवाल यांना पत्र; म्हणाला, 'तिहार जेलमध्ये तुमचे स्वागत आहे')
पहा व्हिडिओ -
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Delhi CM Arvind Kejriwal, Congress leader Sanjay Nirupam says, "... The Court will decide if Arvind Kejriwal has taken any money or not, I cannot say anything on that... But when a person, especially a CM, is accused of corruption and says that he… pic.twitter.com/5hwpe0oQWs
— ANI (@ANI) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)