Reliance Jio Launches Jio 5G Services: राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू झाली आहे. शनिवारी रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी श्रीनाथजी मंदिरात याचे लॉन्चिंग केले. यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. नाथद्वारामध्ये 5G सेवा सुरू झाली आहे, त्यामुळे आता येथील लोकांना वेगवान इंटरनेट वापरता येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनीही याच मंदिरातून 4G सेवा सुरू केली होती. मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यातच नाथद्वारा मंदिरात दर्शन घेतले होते. यादरम्यान त्यांनी या मंदिरातून 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)