महाराष्ट्रात शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिव जयंती साजरी केली जाते पण काही शिवभक्त तिथीनुसार देखील शिव जयंती करतात. त्यामुळे यंदा फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस शिवजयंती साजरी करणार्या शिवप्रेमींसाठी खास दिवस आहे. या शिवजयंतीचं औचित्य साधत महाराष्ट्रात यंदा काही विशेष कार्यक्रम नसले तरीही कोरोना संकटाचा प्रादुर्भाव पाहता अत्यंत साधेपणाने राज्यभर ही शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सारेच कार्यक्रम व्हर्च्युअल साजरे केले जात असल्याने शिवप्रेमींना ऑनलाईन शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी ट्वीटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रकाश जावडेकर
भारत के महान योद्धा एवं रणनीतिकार छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर आदरांजलि। pic.twitter.com/dO5q14OneY
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 31, 2021
महापौर किशोरी पेडणेकर
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 31, 2021
खासदार विनायक राऊत
थकलेल्या विचारांना स्फूर्ती देणारे अजरामर विचारवंत म्हणजे,
श्रीमंतयोगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, महाराजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/tYXmwMWwJJ
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) March 31, 2021
सुनिल शेळके
शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी।।
अवघ्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत, रयतेचा लोककल्याणकारी राजा, श्रीमंतयोगी, क्षत्रियकुलावतंस, राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा मुजरा.!#शिवजयंती #shivjayanti pic.twitter.com/GVlItoFD1c
— Sunil Shelke (@shelkesunilanna) March 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)