पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यंदाही देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. पीएम मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेजवळ जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत, असे नाही. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)