महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलने महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) 2023 साठी वेबसाइट लाँच केली आहे. याशिवाय, सीईटी सेलने तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च शिक्षण परीक्षांसाठी MHT CET अभ्यासक्रमही जाहीर केला आहे. MHT CET 2023 नोंदणी, प्रवेशपत्र, परीक्षेचा निकाल आणि प्रवेश प्रक्रिया अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर उपलब्ध होईल.

MHT CET 2023 परीक्षेच्या तारखा या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा 9 ते 20 मे या कालावधीत होणार आहे. MHT CET परीक्षा 9, 10, 11, 12, आणि 13 मे रोजी होणार आहे. पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गट परीक्षा 15,16,17,18,19 आणि 20 मे रोजी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)