Rameshwaram Cafe Blast Case: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. यात तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूमध्ये 5 आणि उत्तर प्रदेशात 18 ठिकाणी छापे टाकल्यानंतर मुझम्मील शरीफ याला ताब्यात घेतले. तपास यंत्रणेने याआधी मुख्य आरोपी मुसावीर शाजिब हुसेन याची ओळख पटवली होती. त्यानेच हा स्फोट घडवून आणला होता.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)