मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली आहे. राजधानी आयझॉलमधील एका क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांची मुलगी मिलारी छांगटे यांना आधी वेळ घेतल्याशिवाय भेटण्यास नकार दिला होता. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला क्लिनिकमध्ये भेटायला येण्याआधी वेळ घेण्यास सांगितले. याच रागातून तिने डॉक्टरांना मारहाण केल्याचे समजते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मिझोराम युनिटने या घटनेचा विरोध केला. त्याचवेळी डॉक्टरांनी काम करताना काळे बिल्ला लावले. यानंतर मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून जाहीर माफी मागितली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)