दिल्लीच्या तिहार तुरुंगात फसवणूक करून भरती झालेल्या 50 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये 30 वॉर्डर, 9 सहायक अधीक्षक आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या भरती दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (DSSB) 2020 मध्ये केल्या होत्या. जी बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात आली. मात्र, DSSB ने नंतर पडताळणी केली तेव्हा 50 कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. तपासणी DSSB कडे उपलब्ध डेटाशी जुळत नाही. अंतिम अहवाल आल्यानंतर आता तिहार तुरुंगात वेगवेगळ्या पदांवर फसवणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (हेही वाचा - PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार; राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)