Terrorist Attack In Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पुंछमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पूंछमधील सुरनकोटमध्ये शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. माहितीनुसार, या हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात लष्कराचे अनेक जवान जखमी झाले असून, जखमी जवानांना पुढील उपचारांसाठी कमांड हॉस्पिटल, उधमपूर येथे हलवण्यात आले आहे. घटनेनंतर शाहसीतारजवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत. या घटनेबाबत अजून माहितीची प्रतीक्षा आहे. याआधी 21 डिसेंबरला दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये 5 जवान शहीद झाले. ही घटना 4 दहशतवाद्यांनी घडवली होती. (हेही वाचा; Uttarakhand Accident: डेहराडूनमध्ये कार खोल खड्ड्यात पडली, 5 जणांचा मृत्यू, 1 जखमी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)