Tamil Nadu Hooch Tragedy: तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात कथित विषारी दारू पिऊन मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विषारी दारू प्यायल्याने येथे आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री एम सुब्रमण्यम यांनी आतापर्यंत 53 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या प्रकरणाचा तपास सीबी-सीआयडी करत आहे. या प्रकरणात 49 वर्षीय (बेकायदेशीर दारू विक्रेता) के. कन्नूकुट्टी याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 200 लिटर अवैध दारूच्या तपासात, त्यामध्ये घातक 'मिथेन' असल्याचे उघड झाले आहे.
या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले होते की, 'कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दु:ख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. हा अपघात रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.’ या घटनेनंतर राज्यातील स्टॅलिन सरकारच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विरोधी पक्ष मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तामिळनाडू सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. विषारी दारू प्यायल्याने एकूण 165 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Soft Drink Consumption in Indian Households: भारतीय कुटुंबात बाटलीबंद शीतपेय सेवनाचे प्रमाण वाढले, गेल्या वर्षीपासून 50 टक्क्यांनी वाढला वापर; अहवालात खुलासा)
पहा पोस्ट-
Tamil Nadu Hooch tragedy toll rises to 53. Bodies lined up for mass cremation. #5Live with @ShivAroor: https://t.co/7Zq7YbakxS#TamilNadu #HoochTragedy #Kallakurichi | @PramodMadhav6 pic.twitter.com/TVJtVmjCw3
— IndiaToday (@IndiaToday) June 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)