Doctors Remove 1.5 Inch Needle From Teen's Lung: डॉक्टरांचे कौशल्य म्हणा किंवा चमत्कार, तामिळनाडूमध्ये 4 मिनिटांच्या आत शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी 14 वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले आहेत. डॉक्टरांनी या मुलीच्या फुफ्फुसात अडकलेली 4 सेमी लांबीची सुई बाहेर काढली आहे, ज्यासाठी अवघे साडेतीन मिनिटे लागली. तयार होताना कपड्यात अडकलेली सुई मुलीच्या तोंडात गेली व तिने ती गिळली. त्यानंतर तीव्र वेदनांमुळे तिला रुग्णालयात आणले असता, अल्ट्रासाऊंडमध्ये फुफ्फुसात अडकलेली सुई दिसून आली. सुई काढण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. कुटुंबीयांच्या संमतीने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मुलीच्या फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना तामिळनाडूच्या तंजावर शहरात घडली. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ब्रॉन्कोस्कोपी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुई बाहेर काढली. सुई काढल्यानंतर मुलीला डिस्चार्ज देण्यात आला. (हेही वाचा: Warning Against BORG Trend: तरुणाईमध्ये वाढत आहे 'बोर्ग मद्य' पिण्याचा ट्रेंड; तज्ञांनी जारी केला इशारा, ठरू शकते जीवघेणे, जाणून घ्या सविस्तर)
पहा व्हिडिओ-
VIDEO | Doctors of a private hospital in Tamil Nadu's Thanjavur have set a record by removing a four-cm-long needle from a 14-year-old girl's lung without using a knife in three and a half minutes. The girl had swallowed the needle while dressing.
Doctors of the hospital used a… pic.twitter.com/dvSvQz2hJ7
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)