काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत न्यायालयाने (Surat Court) दोषी ठरवले आहे. कथित 'मोदी आडनाव' (Modi Surname) टिप्पणीबद्दल दाखल करण्यात फौजदारी गुन्ह्याची आज झालेल्या सुनावणीत राहुल गांधी यांना दोषी ठरवले आहे. 2019च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत बोलताना कथीतरित्या म्हटले होते की, 'सर्व चोरांचे आडनाव मोदी हेच कसे काय असते?' राहुल गांधी यांच्या याच विधानावर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी जोरदार आक्षेप घेत तक्रार केली होती आणि न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना या प्रकरणी 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर त्यांना जामीन देखील मिळाला आहे.
पहा ट्विट
Gujarat | Surat District Court holds Congress MP Rahul Gandhi guilty in the criminal defamation case filed against him over his alleged 'Modi surname' remark. pic.twitter.com/VXdrvFAjyK
— ANI (@ANI) March 23, 2023
गुजरात: कांग्रेस सांसद राहुल गांधी को मामले में 2 साल कैद की सज़ा सुनाई गई। इसके बाद फिर उन्हें ज़मानत मिल गई।
सूरत ज़िला अदालत ने आज राहुल गांधी को उनकी कथित 'मोदी सरनेम' टिप्पणी को लेकर दायर आपराधिक मानहानि मामले में दोषी ठहराया था। https://t.co/pBAqbk7VQc
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)