शिवजयंती निमित्त आज जगभरातून शिवप्रेमी महाराजांना मानाचा मुजरा करत आहे. दरवर्षी तारखेप्रमाणे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याच्या स्वरूपात साजरी केली जाते. मागील 2 वर्ष कोरोना संकटामुळे त्यावर बंधनं होती पण यंदा दणक्यात ती साजरी केली जात आहे. शिवप्रेमी सोशल मीडीयामध्येही शिवजयंती साजरी करत आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेक मान्यवरांचादेखील शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Narendra Modi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/alPjOrLdT4
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2022
Sambhaji Chhatrapati
मिळालेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, "सार्वभौम स्वराज्य" स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 19, 2022
Amit Shah
धर्म ध्वज रक्षक छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र के प्रेरणा पुरुष हैं।
उन्होंने धर्म, राष्ट्रीयता, न्याय और जनकल्याण के स्तम्भों पर सुशासन की स्थापना कर भारतीय वसुंधरा को गौरवांवित किया।
शिव-जयंती पर अद्भुत शौर्य और देशभक्ति की अद्वितीय प्रतिमूर्ति के चरणों में वंदन करता हूँ। pic.twitter.com/dJw7ZcS83V
— Amit Shah (@AmitShah) February 19, 2022
अमोल कोल्हे
माणसाच्या जन्माला येऊनही कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचा वस्तुपाठ या मातीला घालून देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!#ShivJayanti2022 pic.twitter.com/EUchgMcBik
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 19, 2022
Aditi S Tatkare
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत,छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा..! सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दीक शुभेच्छा! pic.twitter.com/6c3h3DABGo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 18, 2022
Rahul Gandhi
वीर, पराक्रमी छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उन्हें सादर नमन।
अहंकार और अन्याय के सामने निडरता ही सबसे प्रभावशाली हथियार है। pic.twitter.com/fZAmaOWMhh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2022
Sachin Tendulkar
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. किती ही कठीण परिस्थिती असली तरीही बुद्धी आणि शौर्याच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो हा विश्वास महाराजांनी आपल्या सर्वांना दिला. जय शिवाजी.#ShivajiJayanti pic.twitter.com/2K4F8m7HOU
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)