समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर वैधता देण्यास नकार दिला होता. समलिंगी जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार कायदा मान्य करत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3-2 बहुमताच्या निर्णयात असे म्हटले होते की, अशी परवानगी केवळ कायद्याद्वारेच दिली जाऊ शकते आणि न्यायालय कायदेशीर बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आता या निर्णयाबाबत याचिकाकर्त्यांपैकी एक उदित सूद यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. (हेही वाचा: HC on Denial of Sex by Spouse: 'जोडीदाराने सेक्ससाठी नकार देणे ही मानसिक क्रूरता'- Delhi High Court)
Breaking: Review Petitions Have Been filed Against The Supreme Court Constitution Bench Judgement in Same-sex marriage Case #samesexmarriage #SupremeCourt pic.twitter.com/ZI9FC3f83L
— Live Law (@LiveLawIndia) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)