राजस्थानच्या विधिमंडळामध्ये आज (10 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर होताना मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत 8 मिनिटं जुना अर्थसंकल्प वाचत होते. काही वेळतच त्यांना ही बाब सहकार्यांनी लक्षात आणून दिली. पण यावरून विरोधक भाजपा विधिमंडळात आक्रमक झाली. त्यांनी हा अर्थ संकल्प लीक झाल्याची शंका उपस्थित केली. दरम्यान हा अर्थसंकल्प मांडला जाऊ नये त्यांना पुन्हा नवा अर्थसंकल्प बनवण्याची संधी द्यावी अशी आक्रमक भूमिका BJP leader Gulab Chand Kataria यांनी घेतली.
पहा ट्वीट
#WATCH | Rajasthan State Assembly proceedings disrupted as the Opposition alleges that CM Ashok Gehlot presented old budget today
This budget cannot be presented. Was it leaked?: BJP leader Gulab Chand Kataria pic.twitter.com/Ns4jCrVoYY
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)