18 व्या लोकसभेचं आजपासून पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. यामध्ये आज नव्या लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लोकसभेमध्ये नव्याने सदस्यत्त्वाची शपथ घेतली आहे.  मोदींची ही सलग तिसरी टर्म असून शपथ घेण्यासाठी येताच सभागृहामध्ये 'मोदी-मोदी' ची घोषणा सुरू झाली. 2014 पासून नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. आज पंतप्रधान मोदींप्रमाणेच  लोकसभेचे  280 सदस्य शपथबद्ध होणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)