बेलथरा रोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य गेटजवळ झोपलेल्या मुलाची मान दाबत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलिया जिल्ह्यातील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानाला निलंबित करण्यात आले आहे. आरपीएफचे स्थानिक प्रभारी रमेश चंद्र मीना यांनी रविवारी सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बेलथरा रोड स्टेशनवर आरपीएफ जवान बलेंदू सिंग मुख्य गेटजवळ झोपलेल्या मुलावर पाय ठेवून त्याची मान दाबताना दिसत आहेत. या घटनेनंतर सोशल मिडीयावर संताप देखील व्यक्त करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)