लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. एनडीए असो की इंडिया, कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीत. आता भाजप कार्यालयात पीएम नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी एनडीए सरकार स्थापन करता असल्याचा दावा केला. 

लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाउंटवर लिहिले की, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो. पुढे, पंतप्रधानांनी म्हटले की, मी देशवासियांना आश्वासन देतो की आम्ही त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊ. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या समर्पण आणि अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

पाहा पोस्ट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)