महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात असली तरी, सोशल मीडिया आणि स्वयंघोषीत पत्रकार युट्युबच्या माध्यमांतून निराधार वृत्त देऊ लागले आहेत. अशा लोकांचा पीआयबीने तथ्य पडताळणी करुन पोलखोल करणे सुरु केले आहे. पीआयबीने नुकत्याच केलेल्या एका ट्विटनुसार एका युट्युब चॅनलवर वाढत्या कोरोना व्हायरसमुळे मे महिन्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेऊ नका असे पीआयबीने म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)