राजस्थानमधील उदयपूरमध्ये गोमांसापासून बनवलेले चॉकलेट विकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पोलीस नियंत्रण कक्षापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर बीफ जिलेटिनपासून बनवलेले चॉकलेट कथीतरित्या विकले जात होते. तक्रार मिळताच वैद्यकीय आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुकानातील सर्व बीफ टॉफी जप्त केली. ही टॉफी पाकिस्तानातून मागवण्यात आली होती. आता विभागाकडून शहरातील इतर दुकानांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत माहिती असलेले ट्विट केले आहे. चॉकलेटचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Udaipur, Raj | Based on media reports,we visited a chocolate shop&found some packets of chocolates that are said to be Pak-made.Some samples sent for testing,we'll take action after getting reports:Food Safety Officer,on being asked about Pak-made chocolates being sold in Udaipur pic.twitter.com/qljDkZlyig
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)