Padma Awards 2023: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच पश्चिम बंगालचे डॉ.दिलीप महालनोबिस, संगीतकार झाकीर हुसेन यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी 6 व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे.  सुधा मूर्ती, कुमार मंगलम बिर्ला यांचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. राकेश राधेश्याम झुनझुनवाला (मरणोत्तर), RRR चित्रपटाचे संगीतकार एमएम कीरावानी, अभिनेत्री रवीना रवी टंडन यांचा पद्मश्री पुरस्कार विजेत्या 91 जणांमध्ये समावेश आहे.

यंदा 9 जणांना पद्मभूषण तर 91 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. या यादीत 19 पुरस्कार विजेते महिला आहेत. यादीतील परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 2 आणि 7 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येईल.  भारतरत्नानंतर, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे अनुक्रमे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत.

पहा संपूर्ण यादी -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)