पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 125 रुपयांचे एक विशेष स्मृती नाणे जारी केले. स्वामीजींनी कृष्णाबाबत जागरूकतेसाठी आंतरराष्ट्रीय संस्था (इस्कॉन) ची स्थापना केली, जी 'हरे कृष्ण चळवळ' म्हणून देखील ओळखली जाते. इस्कॉनने श्रीमद्भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्याचे 89 भाषांमध्ये भाषांतर केले आहे, जे जगभरातील वैदिक साहित्याच्या प्रसारामध्ये एक प्रमुख भूमिका बजावत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीला भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ₹ 125 चे एक विशेष स्मृती नाणे जारी करण्यात आले.@DDNewslive @DDNewsHindi @narendramodi @kishanreddybjp @iskcon pic.twitter.com/XFOV3RK4Z7
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)