Muslim Policemen Allowed To Maintain Beard: मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी करताना म्हटले आहे की, तामिळनाडूतील मुस्लिम पोलिसांना कर्तव्यावर असतानाही दाढी ठेवण्याची परवानगी आहे. मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे की, मुस्लीम पोलीस ट्रिम केलेली, व्यवस्थित आणि लहान दाढी ठेवू शकतात आणि यासाठी त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये. मद्रास हायकोर्टाने 1957 च्या मद्रास पोलीस राजपत्राचाही संदर्भ दिला. बार आणि बेंचच्या अहवालानुसार , मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एल व्हिक्टोरिया गौरी यांनी 5 जून 2024 रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारत हा विविध धर्म आणि रीतिरिवाजांचा देश आहे आणि पोलीस विभाग आपल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेनुसार दाढी ठेवल्याबद्दल दंड करू शकत नाही. मक्केहून परतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर दाढी ठेवून हजर राहिल्याबद्दल शिक्षा झालेल्या पोलीस हवालदाराच्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला. (हेही वाचा: Sexual Assault: पीडितेच्या खाजगी भागाला लिंगाने स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यानुसार गंभीर लैंगिक अत्याचार; Meghalaya High Court चा मोठा निर्णय)

पहा पोस्ट-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)