रशिया-युक्रेन मधील संघर्षाच्या वृत्तानंतर काल (24 फेब्रुवारी) जगभरात त्याचे आर्थिक परिणाम दिसायला सुरूवात झाली होती. मुंबई शेअर मार्केट देखील काल गडगडले होते. पण अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय दिल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आज मार्केटमध्ये पहायला मिळत आहेत. मुंबई शेअर मार्केट आज खुला होताच सेन्सेक्स 1151.82 अंकांनी वधारून 55,681.73 वर पोहचला आहे तर निफ्टी 352.60 अंकांनी वधारून 16,600.55 पोहचली आहे.
ANI Tweet
Sensex surges 1151.82 points, currently at 55,681.73. Nifty rises 352.60 points, currently at 16,600.55.#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/dgG1u2yi1R
— ANI (@ANI) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)