नेटफ्लिक्सचा लोकप्रिय शो 'मनी हाईस्ट'चा पुढचा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा या शोचा पाचवा सीझन असून तो शेवटचा सीझन असणार आहे. दोन भागांमध्ये हा सीझन प्रदर्शित होणार असून, त्यातील पहिला भाग 3 सप्टेंबर तर दुसरा भाग 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये जयपूरच्या एका कंपनीने 'मनी हाईस्ट'चा शेवटचा सीझन पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याचे नमूद केले आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)