Mission Divyastra: भारताच्या स्वदेशी अग्नी-5 क्षेपणास्त्र "दिव्यास्त्र'ची चाचणी यशस्वी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आणि डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. अग्नी-5 हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज अणु क्षेपणास्त्र आहे. एमआयआरव्ही हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये क्षेपणास्त्रामध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असते. ज्याच्या मदतीने तुम्ही शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करू शकता.

या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे केवळ चीन आणि पाकिस्तानच नाही तर अर्धे जग भारताच्या ताब्यात आले आहे. भारताकडे अग्नी मालिकेतील 1 ते 5 पर्यंतची क्षेपणास्त्रे आहेत, त्यांच्या रेंज वेगवेगळ्या आहेत. अग्नी 5 क्षेपणास्त्र हे अग्नी मालिकेतील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र 5 हजारांहून अधिक किमी अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. देशाच्या दीर्घकालीन सुरक्षा गरजा लक्षात घेऊन अग्नी 5 क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र जवळजवळ संपूर्ण आशियाला आपल्या स्ट्राइक रेंजमध्ये आणू शकते. भारताने या चाचणीसाठी बऱ्याच दिवसांपासून तयारी केली होती. दिल्ली ते बीजिंग हे अंतर 3791 किमी आहे, हे अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला 12.63 मिनिटे लागतील. याशिवाय पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला पोहोचण्यासाठी केवळ दीड मिनिटांचा अवधी लागला. फायर पॉवर बघितले तर पाकिस्तानच्या पुढे अफगाणिस्तान आणि इराणही त्याच्या आवाक्यात येईल. (हेही वाचा: Jio To Enter In UPI Payments: मुकेश अंबानींची जिओ कंपनी लवकरच युपीआय सेगमेंटमध्ये प्रवेश करणार; Paytm आणि PhonePay शी होणार स्पर्धा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)