Delhi Fire: राजधानी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये सोमवारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर लोक आपला जीव वाचवण्यासाठी रेस्टॉरंटच्या छतावर चढले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी गार्डन मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या जंगल जंबूर रेस्टॉरंटमध्ये आग लागली. हे रेस्टॉरंट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. दुपारी 2.14 च्या सुमारास ही आग लागली. अनेकांनी आजूबाजूच्या इमारतींच्या छतावरून उड्या मारून आपला जीव वाचवला आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे रेस्टॉरंटमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दिल्लीतील राजौरी गार्डन जंगल जंबोरी रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, पहा व्हिडिओ -
राजौरी गार्डन के पास एक रेस्टोरेंट में लगी आग.
इस तरह कूद कर जान बचा रहे लोग.@SandhyaTimes4u @NBTDilli pic.twitter.com/cTiFbJVy1J
— सूरज सिंह/Suraj Singh 🇮🇳 (@SurajSolanki) December 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)