भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये आपल्या विजयासाठी जोरदार प्रचार करत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, कंगना रणौतने मंडीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवण केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कंगना राणौत राज्याचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. भाजपने चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) मंडीतून तिकीट देऊन उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कोणाची स्पर्धा चित्रपट अभिनेत्री कंगना राणौतसमोर असणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)