बेंगळुरूमध्ये भरधाव कारने केलेल्या कहराचा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एका कार चालकाने एका व्यक्तीला धडक दिली आणि त्याला बोनेटवर कित्येक मीटरपर्यंत ओढले. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भरधाव वेगाने येणारी कार त्या व्यक्तीला धडकल्यानंतर त्याला बॉनेटवर ओढत आहे. दरम्यान, तो स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध जोरजोरात ओरडत आहे. मात्र कार चालक त्याला ओढतच राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 15 जानेवारी रोजी मरम्मा मंदिर सर्कलजवळ घडली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)