"पुरुष एस्कॉर्ट्सची आवश्यकता" असे लिहिलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, भाजपशासित उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील कोटद्वार शहरात सर्व पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारातही पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचे वृत्त आहे. पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. डेहराडूनच्या कोटद्वार शहरात गिगोलो जॉब देणारे पोस्टर सर्वत्र चिकटवण्यात आले होते. “प्लेबॉय जॉब्स! एस्कॉर्ट कंपनीत सामील होऊन मुले दररोज 5,000-10,000 रुपये कमवू शकतात,” असा या पोस्टरमध्ये दााव करण्यात आला असून पोस्टरवर व्हॉट्सअॅप नंबर देखील देण्यात आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)