छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सक्रीय असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि भूपेश बघेल सरकारवल जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महादेव बेटिंग अॅप हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. ज्यामुळे बघेल सरकारचा खेळ समाप्त होणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना तुरुंगातही जावे लागेल. सरकारी यंत्रणा पुरावे मिळाल्यावरच चौकशी करत असतात. त्यामुळे यंत्रणांवर उगाच टीका करत बसू नये. काँग्रेस काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)