मध्य प्रदेशात भाजपच्या मोठ्या विजयानंतर आता मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवराजसिंह चौहान यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नसल्याचे सांगितल्याने हा प्रश्न जटील बनला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि आताही नाही. मी फक्त पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष जे काही पद किंवा जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करेन." (हेही वाचा - Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver: कर्जमाफी करुन राज्यातील बळीराजाला दिलासा द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)