Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक संपताच एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. यंदाच्या एक्झिट पोलच्या निकालांवर नजर टाकली तर, 2019 च्या तुलनेत भाजपने आपला मतांचा हिस्सा आणि जागांची संख्या वाढवल्याचे दिसत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्याकुमारीच्या प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियलमधील 45 तासांची ध्यानधारणाही आज पूर्ण झाली आहे. त्यानंतर पीएम मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पीएम मोदींनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते म्हणतात, ‘भारताने मतदान केले! ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांचा सक्रिय सहभाग हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मला भारताच्या नारी शक्ती आणि युवा शक्तीचे विशेष कौतुक करायचे आहे. त्यांची मतदानात भक्कम उपस्थिती हे अतिशय उत्साहवर्धक लक्षण आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘मी विश्वासाने सांगू शकतो की एनडीए सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी भारतातील जनतेने विक्रमी संख्येने मतदान केले आहे. संधिसाधू INDI युती मतदारांशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरली. ते जातीयवादी आणि भ्रष्ट आहेत. मूठभर राजघराण्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने असलेली ही युती राष्ट्रासाठी भविष्यवादी दृष्टी सादर करण्यात अयशस्वी ठरली.’ (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Exit Poll: एक्झिट पोलचे निकाल कितपत अचूक आहेत? जाणून घ्या 2009, 2014 आणि 2019 मध्ये काय घडले)
पहा पोस्ट-
I can say with confidence that the people of India have voted in record numbers to reelect the NDA government. They have seen our track record and the manner in which our work has brought about a qualitative change in the lives of the poor, marginalised and downtrodden.
At the…
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2024
I would like to applaud each and every NDA Karyakarta. Across the length and breadth of India, often braving intense heat. I compliment them for meticulously explaining our development agenda to the people and motivating them to come out and vote. Our Karyakartas are our greatest…
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)