कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी महिलांद्वारे आयपीसी कलम 498A च्या होणाऱ्या गैरवापरावर भाष्य केले. न्यायालयाने सांगितले की, महिलांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498A चा गैरवापर करून 'कायदेशीर दहशतवाद' सुरू केला आहे. या कलमाची तरतूद एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा त्याच्या नातेवाईकांद्वारे क्रौर्याचा गुन्हा ठरवणारी तरतूद आहे. सध्या अनेक महिला या कलमाचा गैरवापर करत आहेत. एकल-न्यायाधीश न्यायमूर्ती सुभेंदू सामंता म्हणाले की, कलम 498A महिलांच्या कल्याणासाठी लागू करण्यात आले होते, परंतु आता खोटे गुन्हे दाखल करून त्याचा गैरवापर केला जात आहे.
न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, विधीमंडळाने समाजातून हुंडाबळी दूर करण्यासाठी कलम 498A ची तरतूद लागू केली आहे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, या तरतुदीचा गैरवापर करून नवा कायदेशीर दहशतवाद पसरवला जात आहे. (हेही वाचा: अभिनेते Prakash Raj विरूद्ध Chandrayaan-3 mission च्या खिल्ली उडवणार्या ट्वीट वरून पोलिसांत तक्रार दाखल)
Section 498A meant to strike out #dowry menace from society but by its misuse, new legal terrorism is unleashed: Calcutta HC pic.twitter.com/VSOYnwqTwY
— Live Law (@LiveLawIndia) August 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)