HC on Hindu-Muslim Couple: कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच एका हिंदू महिलेला तिच्या मुस्लिम पतीसोबत राहण्याची परवानगी दिली. महिलेची या व्यक्तीशी भेट सोशल मीडियाद्वारे झाली होती. न्यायमूर्ती एस सुनील दत्त यादव आणि व्यंकटेश नाईक टी यांच्या खंडपीठाने सांगितले की, महिला प्रौढ आहे, तिचे लग्न झाले आहे ती शिक्षण घेत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महिलेने तिच्या आईसोबत राहण्यास नकार दिला आहे, त्यामुळे ती तिच्या पतीसोबत राहू शकते. मुलीच्या आईने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र मुलीने कोर्टासमोर तिला तिच्या आईसोबत राहायचे नसल्याचे सांगितले.

1 एप्रिल रोजी लग्न झाल्यानंतर मुलगी केरळमध्ये तिच्या पतीसोबत राहत होती. त्या ठिकाणी ती वाणिज्य पदवी (B.Com) पदवी घेत होती आणि स्वतःचे निर्णय घेण्यास स्वतंत्र होती. न्यायालयाने नमूद केले की, मुलीने तिच्या पालकांचे घर स्वेच्छेने सोडले होते आणि तिला कोणत्याही दबावाचा किंवा अवाजवी प्रभावाचा सामना करावा लागत नव्हता. त्यामुळे या खटल्याला निकालाची गरज नसल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाने हिंदू महिलेला मुस्लिम पतीसोबत राहण्याची परवानगी दिली. (हेही वाचा: निवडणुकीत धार्मिक, जातीय मुद्दे वापरुन प्रचार केल्याने भाजप, काँग्रेसवर निवडणूक आयोग नाराज)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)