ज्येष्ठ विधिज्ञ Kapil Sibal यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणुक जिंकली आहे. सिब्बल यांना 1066 मते मिळाली, तर पुढील दावेदार ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांना 689 मते मिळाली. विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ वकील डॉ. आदिश सी अग्रवाल यांना 296 मते मिळाली आहेत. गेल्या वर्षी बारमध्ये ५० वर्षे पूर्ण करणारे सिब्बल यापूर्वी तीन वेळा SCBA चे अध्यक्ष राहिले आहेत - 1995-1996; 1997-1998 आणि 2001-2002  मध्ये त्यांनी हे पद भूषवलं आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी ते या पदावर होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)