कानपूरच्या किडवाई नगर मध्ये तीन अल्पवयीन मुलांनी चार कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ही मुलं अवघी 8-10 वर्षांची आहे. गीता पार्क मध्ये जी ब्लॉक मध्ये खेळत असताना त्यांनी हा प्रकार केला. एकाने घरातून माचिस बॉक्स आणला आणि ही कुत्र्यांची पिल्लं राहत असलेले घर जाळलं. अचानक आग सगळ्या बाजूने पेटल्याने पिल्लांनाही पळण्याचा कोणताच मार्ग उरला नाही आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी पाणी ओतून आग विझवली मात्र ती कुत्र्यांची पिल्लं वाचू शकली नाही.
Kanpur Horror: Three Minor Boys Burn Four Stray Dog Puppies to Death in Kidwai Nagar #Kanpur #UttarPradesh https://t.co/yKXgEo3AnD
— LatestLY (@latestly) December 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)