सरकारने ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकात (सीपीआय) घसरण झाली असून, ती 6.83 टक्क्यांवर आली आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई 7.44 या 15 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचली होती. जुलै 2023 मध्ये अन्नधान्य महागाई 11.51 टक्के होती, जी ऑगस्टमध्ये 9.94 टक्क्यांवर आली. ग्रामीण भागातील महागाई ऑगस्टमध्ये 7.02 टक्क्यांवर आली आहे, जी जुलैमध्ये 7.63 टक्के होती. जुलै महिन्यात भाज्यांची महागाई गगनाला भिडली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)