भारतीय लष्कराला त्याच्या संशोधन आणि विकास शाखेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वदेशी विकसित 'अपघात प्रतिबंधक प्रणाली'चे (Accident Prevention System) पेटंट मिळाले आहे. भारतीय लष्कराने एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपकरण विकसित केले आहे, जे अपघात टाळण्यास मदत करेल. हे AI-आधारित यंत्र रस्त्यावरील अपघातापूर्वी अलार्म वाजवून ड्रायव्हरला सतर्क करेल. विशेषत: ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप असताना हे उपकरण अतिशय मदतशीर ठरेल. यामुळे अपघाताला आळा घालण्यास मदत होईल, असे लष्कराचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Indian Web Browser: गुगल क्रोमशी स्पर्धा करण्यासाठी भारत सरकार लॉन्च करणार 'स्वदेशी’ वेब ब्राउझर, जाणून घ्या सविस्तर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)