COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा वाढतेय कोरोना रूग्णसंख्या; एका दिवसांत 3,016 नवे रूग्ण, मागील 6 महिन्यांतील उच्चांक

13,509 सध्या अ‍ॅक्टिव्ह रूग्ण भारतामध्ये आहेत.

COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा वाढतेय कोरोना रूग्णसंख्या; एका दिवसांत 3,016 नवे रूग्ण, मागील 6 महिन्यांतील उच्चांक
प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आज भारतामध्ये एका दिवसात 3016 नवे रूग्ण समोर आले आहेत. हा मागील सहा महिन्यातील उच्चांक आहे. 13,509 सध्या अ‍ॅक्टिव्ह रूग्ण भारतामध्ये आहेत. यामध्ये 14 मृत्यू देखील नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी  तीन महाराष्ट्रात, दोन दिल्लीतून आणि एक हिमाचल आणि आठ केरळमध्ये दगावले आहेत. सध्या देशातील कोविड रूग्णांचा एकूण आकडा 5,30,862 वर आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2023 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).