Polycab India Share Price: पॉलिकॅब इंडिया कंपनीवर आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. कंपनीच्या मुंबई येथील जवळपास 50 ठिकाणी इनकम टॅक्स छापेमारीकेली आहे. ही कारवाई झाल्याचे पुढे येताच त्याचा कंपनीच्या शेअर बाजारातील समभागावर मोठा परिणाम झाला. कंपनीचे व्यवस्थापन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांचीही कसून चौकशी केली जात आहे. या कारवाईमुळे कंपनीचे बाजारातील शेअर एका झटक्यात 3% नी घसरले. बाजार सुरु झाला तेव्हा हे समभाग 5505.90 रुपयांवर ट्रेड करत होते. वृत्त येताच ते 5450.00 रुपयांवर ट्रेड करु लागले.
The income tax department is conducting searches at 50 locations of Polycab across India: Sources to @TimsyJaipuria
Check more details here- https://t.co/NxDHWQHutK
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) December 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)