कोविडचा (Coronavirus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. आज त्यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नकोय पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असे ते यावेळी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)