HC on 'Jija' & 'Sali' Relation: अलाहाबाद हायकोर्टाने नुकतेच मेहुणा आणि मेहुणी (पत्नीची बहीण) यांच्यातील नातेसंबंधावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने या दोघांमधील संबंध ‘अनैतिक’ म्हटले आहेत, परंतु जर महिला प्रौढ असेल तर, त्यांचे संबंध बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये येत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. लग्नाचे आमिष दाखवून मेहुणीला पळवून नेल्याचा आणि बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या मेव्हण्याबाबत कोर्टाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने आरोपीला (मेहुण्याला) जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवले. मेहुणा आणि मेहुणी यांच्यातील संबंधांची माहिती कुटुंबियांना समजताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला प्रौढ होती, सुरुवातीला तिने तिच्या जबानीत आरोप फेटाळले, पण नंतर तिचे म्हणणे बदलले आणि आरोपीशी संबंध असल्याचे मान्य केले.

न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल खंडपीठाने या दोघांचे नाते सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचे मान्य केले. मात्र न्यायालयाने म्हटले की, ही महिला प्रौढ आहे आणि तिने संमतीने हे नाते जोडले होते, त्यामुळे ते बलात्काराच्या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही. आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्यामुळे आणि तो जुलै 2024 पासून कोठडीत असल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. (हेही वाचा: Delhi High Court on Physical Relation: 'शारीरिक संबंध'चा अर्थ 'लैंगिक छळ' असा होत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाकडून बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता)

HC on 'Jija' & 'Sali' Relation:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)