France Riots Video:  सद्या सोशल मीडियावर फ्रान्य येथील दंगलीचे थरारक चित्र पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये हाणामारी आणि अशांतताचे दृश्य दिसत आहे. पॅरिस येथे पोलीसांच्या गोळीबारात  १७ वर्षाच्या मुलांचा मृत्यू झाला आहे.वाहतूकीचे नियम तोडल्याने पोलीसांनी हे केलं असल्याचे दिसून आले आहे. संतप्त लोकांनी दंगली केल्या.  याचदरम्यान दंगलीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पालकांना आवाहन केले आहे. आपल्या मुलाला घरा बाहेर पडू देवू नका. या दंगलीत जाळपोळ, हल्ला होत आहे. अनेकांनी दुकाने लुटले आहेत. पॅरिसमध्ये नायका (Nike), झारा(Zara), लुई व्हिटॉन (Louis Vuitton) स्टोअर लुटले जात आहे. त्यांच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)