केंद्र सरकारशी चर्चा अनिर्णित राहिल्यानंतर शेतकऱ्यांनी आज पुन्हा दिल्ली मोर्चाची घोषणा केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टरने शेतकरी आज सकाळी 11 वाजल्यापासून दिल्लीकडे प्रयाण करतील. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात येत आहे. त्याचवेळी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी जेसीबी आणि ट्रॅक्टरऐवजी बसने दिल्लीला जावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)