दिवाळी निमित्त विक्री करण्यासाठी साठवलेल्या फटाक्यांच्या साठ्याचा स्फोट झाला आहे. ही घटना पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पेट्रोल बंकरजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, साठा करुन ठेवलेले फटाके हे बेकायदेशीरपणे साठवले होते. त्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. दरम्यान या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाला आहे. आतापर्यंत तरी या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की, पेट्रोल बंकच्या बाजूला आणि बिक्कावोलु मंडलातील तोस्सिपुडी गावात एका राईस मिलजवळ झालेल्या स्फोटामुळे इंडियन ऑइलच्या इंधन किरकोळ दुकानाला आग लागली नाही. मात्र, अचानक झालेल्या स्फोटामुळे भिंतींना तडे गेले तसेच खिडक्यांची तावदाणे फुटली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)